भारताची UPI आणि संयुक्त अरब अमिरातीची AANI पैसे हस्तांतरण यंत्रणा एकमेकांशी जोडण्याचे दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळं संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या ३० लाख भारतीयांना सहजपणे भारतात पैसे पाठवता येतील, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. भारत आणि UAE उच्च स्तरीय संयुक्त कृती दलाच्या १२ व्या बैठकीनंतर मुंबईत ते वार्ताहरांना संबोधित करत होते. UAE नं भारतात फूडपार्क स्थापन करायची तयारी दाखवली आहे. यात येत्या २-अडीच वर्षात २ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळं UAE मध्ये खाद्यसुरक्षा येईल, भारतीय शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि भारतीय युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील, असं गोयल यावेळी म्हणाले.
Site Admin | October 7, 2024 7:41 PM | India | UAE