डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 15, 2025 8:39 PM | India | SRILANKA

printer

श्रीलंकेच्या पोलीस स्टेशन्सना ८० सिंगल कॅब पुरवण्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामंजस्य करार

श्रीलंकेच्या उत्तर प्रांतातल्या पोलीस स्टेशन्सना ८० सिंगल कॅब पुरवण्यासाठी आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सामंजस्य करार झाला. विकासातली भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी हा करार करण्यात आला असून त्यासाठी भारतानं ३० कोटी श्रीलंकन रुपयांचं अनुदान दिलं आहे.  भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षा सचिव डी डब्ल्यू आर बी सेनेविरात्ने यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. नागरिकांना अधिकाधिक सुरक्षा पुरवण्याबरोबरच कायदा अंमलबजावणीत सुधारणा करणं हे या कराराचं उद्दिष्ट आहे. भारताच्या सीमा जनताभिमुख विकास सहकार्य प्रयत्नांचा हा भाग आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा