डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ शिखर संमेलनाचं यजमानपद भूषावणार

 

भारत उद्यापासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ शिखर संमेलनाचं यजमानपद भूषावणार आहे. शाश्वत भविष्यासाठी सक्षम ग्लोबल साऊथ अशी या संमेलनाची संकल्पना आहे.

 

देशा-देशातला परस्पर संघर्ष, संमेलनात अन्न आणि ऊर्जा सुरक्षा संकट, हवामान बदल यासारख्या आव्हानांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार  मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात  म्हटलं आहे. शिखर परिषदेत, ग्लोबल साउथमधील सहभागी देशातील विकासाच्या क्षेत्रात आव्हाने, प्राधान्यक्रम आणि उपाय यावरही चर्चा होणार आहे.

 

यापूर्वीच्या  दोन शिखर बैठकांप्रमाणेच, ही  तिसरी शिखर परिषदही दूरस्थ स्वरूपात होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ या संकल्पनेचा विस्तार असलेला हा अभिनव उपक्रम वसुधैव कुटुंबकम या भारताच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा