भारत आपला पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव ‘तरंग शक्ती २०२४’ दोन टप्प्यात पुढील महिन्याच्या 6 तारखेपासून तामिळनाडूतील सुलार इथं आयोजित करणार आहे. या सरावात अंदाजे 30 देश सहभागी होणार असून यातील दहा देश त्यांच्या लढाऊ विमानांसह सरावात सहभागी होणार आहेत. या सरावात भारताच्या संरक्षण पराक्रमाचं प्रदर्शन घडविण्यात येईल आणि आंतरकार्यक्षमता वाढवण्यासाठी सहभागी लष्करांना एक व्यासपीठ मिळेल. सरावादरम्यान, उड्डाण आणि जमिनीवर प्रशिक्षण, संरक्षण प्रदर्शनं आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम देखील आयोजित केले जातील. सहभागी देशांचे संरक्षण कर्मचारी भारतातील तंत्रज्ञान कंपन्यांनाही भेट देतील. भारताने या सरावात सहभागी होण्यासाठी 50 हून अधिक देशांना आमंत्रित केलं होतं.
Site Admin | August 1, 2024 10:09 AM | Tarang Shakti 2024