भारताच्या वतीनं नवी दिल्ली इथं 11 आणि 12 सप्टेंबर रोजी नागरी विमान वाहतूकविषयक दुसऱ्या आशिया-प्रशांत मंत्रीस्तरीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. देशांतर्गत विमान वाहतुकीत शाश्वत वाढ करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. विमानांची देखभाल, दुरुस्ती सेवा, मालवाहतूक क्षेत्रात भारत स्वतःला एक प्रमुख केंद्र म्हणून प्रस्थापित करत असून, जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ म्हणून विकसित होत आहे, असंही त्यांनी सांगितलं. नव्या पर्यावरणपूरक विमानतळांचा विकास आणि देशांतर्गत विमान वाहतुकवाढीला चालना देणाऱ्या उडानसारख्या प्रगतीशील धोरणांबाबतही नायडू यांनी माहिती दिली.
Site Admin | September 10, 2024 9:57 AM | 2nd Asia-Pacific Ministerial Conference | civil aviation