ओमान इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सुरू होईल. काल या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघानं मलेशियाला ३-१ ने नमवत अंतिम फेरी गाठली होती. तर पाकिस्तानी संघानं जपानच्या संघावर ४-२ असा विजय मिळवला होता. या स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला आहे. या स्पर्धेचं विजेतेपद म्हणजे भारतीय संघासाठी विजयाची हॅटट्रिक असणार आहे.
Site Admin | December 4, 2024 8:21 PM | India | Pakistan