डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत २०५० सालापर्यंत उच्च उत्पन्न गटातला देश बनेल – नीती आयोग

देशाचा विकास दर सरासरी ५ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज लक्षात घेता, भारत, २०३०च्या दशकाच्या सुरुवातीला उच्च मध्यम-उत्पन्न गटातला, तर २०५० सालापर्यंत उच्च उत्पन्न गटातला देश बनेल असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. अरविंद वीरमणी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित जागतिक व्यापार विषयक परिषदेत डॉ. वीरमणी यांनी आज बीजभाषण दिलं. त्यावेळी ते बोलत होते. ‘व्यत्ययांशी जुळवून घेताना: लवचिकता, शाश्वतता आणि नवोन्मेष’, ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.

 

उत्पन्नाची पातळी वाढताना, भारतानं पिण्याचं पाणी, स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनासह, शहरी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर द्यायला हवा, असं डॉ. वीरमणी यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा