भारताने काल पृथ्वी-२ या आण्विक क्षमतेच्या बॅलिस्टीक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. रात्री ओदिशातल्या समुद्रकिनाऱ्यावर ही चाचणी झाली. डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेलं हे क्षेपणास्त्र ५०० ते एक हजार किलोग्रॅम वजनाचा शस्त्रभार घेऊन जाऊ शकते. पृष्ठभागावरुन साडेतीनशे किलोमीटर पर्यंत मारा करु शकणाऱ्या पृथ्वी-२ ला दोन इंजिनं लावली आहेत. या चाचणीच्या वेळी डीआरडीओचे अधिकारी तसंच वैज्ञानिक उपस्थित होते.
Site Admin | August 23, 2024 1:49 PM | DRDO | Prithvi 2 Missile