भारतानं १ हजार ६३३ कोटी लिटर इतकी उच्चांकी इथेनॉल निर्मिती केली असल्याचं केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत भारतीय साखर आणि जैव उर्जा परिषदेचं उद्धाटन करताना बोलत होते. २०३० पर्यंत ५ टक्के बायोडिझेलचं लक्ष्य सरकारनं निश्चित केलं आहे, असं त्यांनी सांगितलं. देशात ऊसाचं उत्पादन ४० टक्क्यांनी वाढलं आहे. तर उत्पादकता १९ टक्क्यानं वाढलं आहे. हे क्षेत्र देशभरातल्या सुमारे साडेपाच कोटी शेतकऱ्यांचा आधार ठरलं आहे, असं ते म्हणाले.
Site Admin | September 26, 2024 8:27 PM