भारत आणि श्रीलंका यांनी दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी सामपूर सौर ऊर्जा प्रकल्पातील ऊर्जेसाठी प्रति युनिट किंमत निश्चित केली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमानं नुकतेच ५ पूर्णांक ९७ अमेरिकी सेंट प्रति किलोवॅट प्रती तास, अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी काल एका जाहीर सभेत ही माहिती दिली. अक्षय ऊर्जा क्षेत्रात १३५मेगा वॅटचा हा प्रकल्प द्विपक्षीय ऊर्जा सहकार्यामध्ये भारताच्या योगदानाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
Site Admin | January 20, 2025 1:07 PM | India | Sampur solar plant | SRILANKA