प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके आज श्रीलंकेतल्या अनुराधापुरा इथं महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. भारतीय मदतीने विकसित केलेला हा ‘महो-ओमानथाई’ रेल्वे मार्ग श्रीलंकेच्या उत्तरेकडील भागाला राजधानी कोलंबोशी जोडेल,ज्यामुळं प्रादेशिक संपर्क वाढून आर्थिक विकासाला चालना मिळेल. याशिवाय ‘महो-अनुराधापुरा’ विभागातील प्रगत रेल्वे वाहतूक नियमन प्रणालीची पायाभरणीही आज करण्यात येणार आहे.