स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली. महितीतंत्रज्ञान आणि नवोन्मेष, संरक्षण, सुरक्षा, पुर्ननवीकरणीय ऊर्जा आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्यांवरही उभय नेत्यांनी चर्चा केली.
परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाचे सचिव तन्मय लाल यांनी बातमीदारांना सांगितलं की, भारत आणि स्पेन यांच्यातला व्यापार १० अब्ज डॉलर्सवर पोचला असून भारतात सुमारे २४० स्पॅनिश कंपन्यांच अस्तित्व आहे, असं त्यांनी सांगितलं. परराष्ट्रव्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर हे देखील सांचेझ यांना भेटून चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात स्पेनचे प्रधानमंत्री मुंबईलाही येणार असून विविध उद्योजक, व्यापारी आणि मनोरंजन जगतातल्या मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. सांचेझ यांच्या उपस्थितीत भारत आणि स्पेन दरम्यान उभयपक्षी सहकार्याचे महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.