भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन आणि सशक्त भागीदारी आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. मुंबई इथं भारत-स्पेन सीईओ फोरमला ते आज संबोधित करत होते, यावेळी स्पेनचे राष्ट्राध्यक्ष एच ई पेद्रो सँचेज उपस्थित होते. दळणवळ, पायाभूत सुविधा आणि उत्पादन या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांची भागीदारी असं गडकरी म्हणाले. शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देईल, अशा आर्थिक संबंधांना बळकटी देण्यासाठी हा संवाद मदत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Site Admin | October 29, 2024 1:47 PM | India-Spain CEOs Forum | Mumbai | Nitin Gadkari