आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून भारतीय वायूसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहेत. अॅक्सिओम स्पेसच्या ए एक्स-४ या अंतराळ मोहिमेची सर्व तयारी झाली असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी दिली आहे. या मोहिमेद्वारे भारत आपल्या अंतराळ क्षेत्रात एक निर्णायक अध्याय लिहिण्याठी सज्ज असल्याचं अवकाश आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. येत्या काही महिन्यांतल्या इस्रोच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबतचे सहकार्य आणि गगनयान सारख्या प्रकल्पांची धोरणात्मक गती अंतराळ तंत्रज्ञानात जागतिक नेता बनण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब असल्याचं त्यांनी म्हटलं.
Site Admin | April 18, 2025 8:16 PM | Dr. Jitendra Singh | Dr.V.Narayanan | India Space Mission | Shudhanshu Shukla
भारत आपल्या अंतराळ प्रवासात पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज
