एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण या क्षेत्रातल्या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा निर्माता बनण्याचं देशाचं ध्येय असायला हवं असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले. एआयचा सर्वाधिक चांगला वापर कृषी आणि आरोग्य क्षेत्रात होऊ शकतो का, यावर संशोधन होऊ शकतं असंही त्यांनी यावेळी म्हटलं. नव उद्योजकांसाठी व्यासपीठ असलेल्या मेडटेक मित्र या उपक्रमाविषयीही पॉल यांनी माहिती दिली. या उपक्रमाद्वारे स्टार्टअप्सना उद्योगातलं वितरण तसंच बाजारातल्या स्थितीविषयी मार्गदर्शन मिळू शकतं, असं पॉल यावेळी म्हणाले.
Site Admin | October 1, 2024 8:26 PM | NITI Aayog