चीनमधील चेंगडू इथं येत्या २० तारखेपासून सुरू होणाऱ्या १५ आणि १७ वर्षांखालील कनिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्य पद बडमिंटन स्पर्धेसाठी भारतानं ३९ खेळाडूंचा संघ पाठवला आहे. १७ वर्षांखालील गटाचं नेतृत्व श्याम बिंडीगणविले तर १५ वर्षांखालील गातच नेतृत्व तन्वी पत्री करणार आहे. गुवाहाटी मधल्या सराव शिबिरानंतर भारतीय संघ काल चेंगडूला रवाना झाला.चीन मध्ये गेल्या वर्षी झालेल्या या अजिंक्य पद स्पर्धेत भारतानं प्रत्येकी एक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं आहे. पुढील वर्षी कनिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्य पद स्पर्धेचं यजमानपद भारतानं स्वीकारलं आहे.