गेल्या काही वर्षात नवोन्मेष क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे भारतानं, यंदाच्या जागितक नवोन्मेष निर्देशांक म्हणजेच जीआयआय 2024 मध्ये 133 देशांत 39 व्या स्थानावर झेप घेतली आहे. 2015 मध्ये 81 व्या स्थानावर असलेल्या भारताची ही लक्षणीय झेप आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत समाज माध्यमावरून एक संदेश प्रसारित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशानं उल्लेखनीय प्रगती केल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. भारतानं मध्य आणि दक्षिण आशियातील 10 अर्थव्यवस्थांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून , कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे, असं यात नमूद करण्यात आलं आहे.
Site Admin | September 27, 2024 10:56 AM | India Rises to 39th Place in Global Innovation Index 2024 | जीआयआय