आशियाई टेबल टेनिसमध्ये अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत पोचला आहे. कझाकस्तानमध्ये झालेल्या उपांत्य पूर्व फेरीत भारतीय संघानं दक्षिण कोरियाचा पराभव केला. मनिका बत्राच्या नेतृत्त्वाखाली भारतानं कोरियाच्या संघाला ३-२ असं पराभूत केलं. त्यामुळं स्पर्धेतलं भारताचं पहिलवहिलं पदक निश्चित झालं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना उद्या जपान सोबत होणार आहे.
Site Admin | October 8, 2024 8:48 PM