डिजीटल कौशल्य क्षेत्रात कॅनडा आणि जर्मनीला मागे टाकत भारतानं दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. असा अहवाल क्यूएस वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्सने जारी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदी यांनी या कामगिरीबद्दल समाजमाध्यमावरील संदेशात आनंद व्यक्त केला.
गेल्या दशकात सरकारनं देशातील तरुणांना स्वावलंबी बनण्यास आणि रोजगार निर्मितीत सक्षम बनवणाऱ्या कौशल्यांनी सुसज्ज करण्याचे काम केलं आहे. देश समृद्धी आणि युवा सक्षमीकरणाच्या दिशेने प्रवास करत असताना हा अहवाल प्रसिध्द होणं समाधानकारक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.