भारत आणि कतार दरम्यान सहकार्याला प्रचंड वाव असून ते वृद्धिंगत करण्याचा उभय राष्ट्रांचा निर्धार असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी सांगितलं. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजतर्फे आयोजित भारत कतार संयुक्त व्यापार मंचाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कतारचे वाणिज्यमंत्री शेख फैज़ल बिन थानी अल थानी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी भारत – कतार दरम्यान दोन समझोता करार झाले.
Site Admin | February 18, 2025 12:52 PM | India | Qatar
भारत-कतार संयुक्त व्यापार मंचाचं उद्घाटन
