शस्त्रबंदी कायम ठेवणं आणि भविष्यात गैरसमज टाळण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहमती झाली आहे. जम्मू – काश्मिरातल्या पूंछमध्ये दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडरच्या बैठकीत ही चर्चा झाली. सुमारे ४ वर्षांनंतर अशा प्रकारची बैठक झाली.
नुकतीच झालेली चकमक आणि ताबारेषेवर आढळून आलेल्या बॉम्बची पार्श्वभूमी या बैठकीला होती. दोन्ही देशातला तणाव कमी करण्यासाठी विद्यमान संपर्क यंत्रणांचा प्रभावी वापर करण्याचा निर्णयही दोन्ही देशांनी घेतला.