जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारत आणि पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर चाकन द बाग या ठिकाणी आज भारत आणि पाकिस्तान लष्कराच्या अधिकाऱ्यांची कमांडर स्तरावरची फ्लॅग बैठक झाली. दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
राजौरी, पूंछ आणि जम्मू या जिल्ह्यांमधल्या अलीकडच्या गोळीबाराच्या घटना, स्नायपरचे हल्ले आणि स्फोटकांचा वापराच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली. पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा यावेळी भारतीय अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. या बैठकीत दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी तणाव कमी करण्याच्या उपाययोजनांवरही चर्चा केली.