भारतात कार्यरत असलेल्या कॅनडाच्या ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी जाण्याचे आदेश भारतानं दिले आहे. त्यात प्रभारी उच्चायुक्त स्ट्युअर्ट रॉस व्हीलर, उप उच्चायुक्त पॅट्रीक हेबर्ट याशिवाय इतर ४ अधिकाऱ्यांना मायदेशी परतण्याचे आदेश भारतानं दिले आहेत. या सर्वांना शनिवारपर्यंत भारत सोडून जायला सांगितलं आहे. याशिवाय भारतानं कॅनडातील आपल्या उच्चायुक्तांसह अन्य राजनैतिक अधिकाऱ्यांनाही माघारी बोलावलं आहे. कॅनडातलं विद्यमान सरकार त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची बांधिलकी पाळेल याची खात्री नसल्यानं त्यांना माघारी बोलावण्यात येत असल्याचं भारतानं म्हटलं आहे.
कुठल्याही पुराव्याशिवाय कॅनडातल्या भारतीय उच्चायुक्तांसह इतर अधिकाऱ्यांना लक्ष्य करणं खपवून घेतलं जाणार नाही, असं भारतानं काल कॅनडाच्या प्रभारी उच्चायुक्तांना स्पष्ट केलं. गेल्या सप्टेंबरमध्ये काही आरोप केल्यानंतर कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टीन ट्रुडो यांनी यासंबंधातले कुठलेही पुरावे सादर केलेले नाही, असं भारतानं म्हटलं आहे.
Site Admin | October 15, 2024 2:38 PM | Canada | India