प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. नजीकच्या भविष्यात दोन्ही देशांना नव्या उंचीवर नेण्यासाठी द्विपक्षी सहकार्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांत परस्परसंमतीनं द्विपक्षी सहकार्य करण्यावर या संवादात सहमती झाली. व्यापार आणि आर्थिक सहकार्य, पशुपालन, औषधनिर्मिती, शिक्षण आणि अंतराळ आदी क्षेत्रांचा यात समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये भारतीय प्रवाशांच्या हिताची काळजी घेतल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी लक्सन यांचे आभार मानले. लक्सन यांनीही प्रवाशांची सुरक्षितता आणि कल्याणासाठी निरंतर प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं.
Site Admin | July 20, 2024 8:30 PM | Christopher Luxon | PM Narendra Modi