डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नेपाळमध्ये काठमांडू इथं भारत-नेपाळ स्टार्टअप परिषद २०२४

भारत-नेपाळ स्टार्टअप परिषद 2024 कालपासून नेपाळमध्ये काठमांडू इथं सुरू झाली. उभय राष्ट्रांमधील सहकार्य आणि नवोन्मेष यांना प्रोत्साहन देण्यासाठी या परिषदेत उद्योजक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एकत्र आले आहेत. स्टार्टअप जाळं निर्माण करण्यासाठी मंच तयार करणं, नवकल्पना मांडणं, विकास आणि गुंतवणुकीच्या संधी शोधणं हे या परिषदेचं उद्दिष्टं आहे. नेपाळला भेडसावत असलेल्या बेरोजगारी, परकीय मदतीवरील अवलंबित्व, व्यापार तूट अशा विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी स्टार्टअप्स हे आशेचे किरण असल्याचं प्रतिपादन भारत-नेपाळ केंद्र पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे सह-अध्यक्ष कमलेश जैन यांनी यावेळी केलं. स्थानिक स्टार्टअप आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार यांच्यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा