भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री डॉ. आरझू राणा देऊबा यांच्यात नवी दिल्ली इथे बैठक झाली. यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला, विविध क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या सहकार्यावर आणि लोकांमधील संबंध आणि राजनैतिक देवाणघेवाण वाढवण्यावर चर्चा केली.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या रायसीना संवाद 2025 च्या 10 व्या आवृत्तीच्या निमित्ताने ही भेट झाली. मंत्री डॉ. राणा यांनी या बैठकीला ‘अत्यंत फलदायी संवाद’ असं म्हटलं आहे.