भुकंपानंतर पुनर्बांधणी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल भारत-नेपाळ यांच्यादरम्यान स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त प्रकल्प देखरेख समितीची पाचवी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नेपाळमध्ये भारत सरकारच्या सहाय्याने भूकंपोत्तर पुनर्बांधणी प्रकल्पांच्या प्रगतीचा व्यापक आढावा घेण्यात आला. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व उत्तर भागाचे अतिरिक्त सचिव मुनू महावर यांनी केलं तर नेपाळच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव पद्मकुमार मैनाली यांनी केलं. 2015 च्या विनाशकारी भुकंपानंतर, भारताने नेपाळला अडीचशे दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं अनुदान देण्याचं मान्य करण्यात आलं होतं. चार वेगवेगळ्या क्षेत्रांना वाटप करण्यात आले; गृहनिर्माण, शिक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक वारसा, या चार क्षेत्रांना हे वापर कऱण्यात आलं होतं. ज्यामध्ये 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स गृहनिर्माणासाठी आणि इतर तीन क्षेत्रांसाठी प्रत्येकी 50 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स वाटप करण्यात आले.
Site Admin | January 28, 2025 10:20 AM | India | Nepal
भारत-नेपाळ यांच्यात संयुक्त प्रकल्प देखरेख समितीची पाचवी बैठक
