भारत आणि मलेशिया ने दहशतवादाचा आणि मूलतत्त्ववादाचा सामना करण्यासाठी तसंच सायबर सुरक्षा, संरक्षणविषयक उद्योगांच्या आणि सागरी सुरक्षेच्या विषयात सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी संमती दर्शवली आहे. नवी दिल्लीत देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि मलेशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे महासंचालक राजा दातो नुशिरवान बिन झैनल अबिदीन यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या दोन्ही देशांमधल्या पहिल्या सुरक्षा संवादात महत्वाच्या तसंच दुर्मिळ खनिजांच्या बाबतीतही सहकार्याला दुजोरा दर्शवला आहे.
Site Admin | January 7, 2025 6:50 PM | ajit doval
भारत आणि मलेशिया देशांमधल्या सुरक्षा सहकार्य बळकट करण्यासाठी संमती
