डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव

दक्षिण आफ्रिकेनं काल गकेबरहा इथल्या सेंट जॉर्ज पार्क मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताचा तीन गडी राखून पराभव केला. भारतानं केलेल्या 125 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं 19 षटकांतच 7 गडी गमावून 128 धावा पूर्ण केल्या. ट्रिस्टन स्टब्सनं 47 धावांवर नाबाद राहत लक्षणीय खेळी खेळली. त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. तर जेराल्ड कोएत्झीने 9 चेंडूत 19 धावा केल्या. भारतातर्फे वरुण चक्रवर्तीनं 5 बळी घेतले. तत्पूर्वी, भारतानं निर्धारित 20 षटकांत 6 बाद 124 धावा केल्या. हार्दिक पंड्यानं सर्वाधिक 39 धावा केल्या. अक्षर पटेलनं 27 धावा आणि तिलक वर्मानं 20 धावांचं योगदान दिलं. या सामन्यातील दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे चार सामन्यांच्या मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे. तिसरा सामना येत्या बुधवारी 13 नोव्हेंबरला सेंच्युरियनमध्ये होणार आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा