जलद गतीनं विक्री होणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात भारत सातत्यानं दोन अंकी वाढीसह आशिया-प्रशांत प्रदेशात आघाडीवर आहे, असं नेल्सनआयक्यु या सर्वेक्षण संस्थेनं काल जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. या अहवालानुसार शहरांमध्ये वास्तव्यास असलेले 41 टक्के भारतीय नागरिक उत्पादनांची माहिती ऑनलाइन पाहतात मात्र प्रत्यक्ष खरेदी ही दुकानातूनच करतात. सणासुदीच्या काळात विशेष सवलती असल्यानं तंत्रज्ञानाधारीत उत्पादनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत असून चलनवाढ असूनही बाजारपेठेतली स्पर्धा वाढत आहे,असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे.
Site Admin | August 22, 2024 10:32 AM | India
ग्राहकोपयोगी गतिमान वस्तूंच्या क्षेत्रात आशिया-प्रशांत प्रदेशात भारत आघाडीवर
