MSCI अर्थात मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनलच्या EMIM अर्थात उद्योन्मुख बाजार गुंतवणूक निर्देशांकातल्या मूल्यांकनात भारतानं चीनला मागे टाकलं आहे. या निर्देशांकात भारताला २२ पूर्णांक २७ शतांश टक्के मूल्य मिळाले आहे, तर चीनची हिस्सेदारी २१ पूर्णांक ५८ शतांश टक्के आहे. गेल्या काही काळात भारतातल्या विविध शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली आहे. त्याचवेळी चीनमधले बाजार काहीशा बिकट अवस्थेत आहेत. या निर्देशांकात समावेश झाल्यानं भारतीय बाजारपेठेत ४ ते साडे ४ अब्ज डॉलरची गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. या निर्देशांकातल्या समावेशाविषयी बाजार विश्लेषक चंद्रशेखर टिळक यांनी आकाशवाणीशी बोलताना म्हणाले…
Site Admin | September 7, 2024 1:48 PM