महिला क्रिकेटमध्ये वेस्टइंडीजविरुद्धचा मर्यादित षटकांचा दुसरा सामना काल भारतानं 115 धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वडोदरा इथं झालेल्या कालच्या सामन्यात हरलीन देओलच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर भारतानं पाहुण्या संघाला 359 धावांचं मोठं लक्ष्य दिलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ 47 व्या षटकापर्यंत केवळ 243 धावाच करू शकला. या मालिकेतला अखेरचा तिसरा सामना येत्या शुक्रवारी होणार आहे.
Site Admin | December 25, 2024 3:33 PM