भारत आणि कुवेतमध्ये इतिहास, संस्कृती आणि परस्परांबद्दलचा आदर असे बहुआयामी संबंध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कुवेतमधल्या एका खाजगी वृत्तसंस्थेला मुलाखतीत ते बोलत होते. ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध असल्याचं ते म्हणाले. व्यापार आणि वाणिज्य या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार सातत्यानं वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. औषधनिर्माण, आरोग्य, तंत्रज्ञान, डिजिटल, नवोन्मेष आणि वस्त्रोद्योग यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याची क्षमता असल्याचं ते म्हणाले. भारताच्या सॉफ्ट पॉवरचा जागतिक स्तरावर असलेला प्रभाव यावर प्रकाश टाकताना प्रधानमंत्री म्हणाले की, गेल्या दशकात भारताची सॉफ्ट पॉवर वाढली असून जगामध्ये देशाचा दर्जाही वाढल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | December 22, 2024 7:32 PM | India | Kuwait | PM Narendra Modi