भारत पुढल्या वर्षी कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. भारत प्रथमच या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार असून पुढल्या वर्षाच्या उत्तरार्धात ही स्पर्धा होईल. भारतीय राष्ट्रीय रायफल संघ ही स्पर्धा आयोजित करणार असून यात रायफल, पिस्तूल आणि शॉटगन प्रकारात स्पर्धा होतील. गेल्या दशकभरात भारतात आयोजित ही नववी मोठी नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा आहे. यापूर्वी भारतानं आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या सहा स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
Site Admin | December 22, 2024 1:59 PM | India | Junior Shooting World Cup