भारत आणि जपानदरम्यान आज नवी दिल्लीत मंत्रिस्तरीय संवाद होणार आहे. भारताकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर तर जपानचे संरक्षणमंत्री किहारा मीनोरू आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री योको कामिकावा या संवादात सहभागी होतील. या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्यासाठी नव्या उपक्रमांविषयी चर्चा होईल आणि द्विपक्षीय सहकार्याचाही आढावा घेतला जाईल. भारत आणि जपानशी संबंधित धार्मिक आणि जागतिक प्रश्नांवरही या बैठकीत चर्चा होईल. या बैठकीमुळे धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक बळकट होईल आणि संरक्षण सहकार्यामध्येही सुधारणा होतील, अशी आशा भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने व्यक्त केली आहे. दुसरा मंत्रीस्तरीय संवाद येत्या सप्टेंबर महिन्यात जपानमध्ये होणार आहे.
Site Admin | August 20, 2024 1:17 PM | India | Japan