डिजिटल पायाभूत सुविधा, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि क्रीडा क्षेत्रात भारत आणि जमैका यांच्यात आज ४ सामंजस्य करार झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जमैकाचे प्रधानमंत्री डॉ. अंड्र्यू होलनेस यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षरी झाली. जमैकाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत. विविध क्षेत्रांमधले भारताचे अनुभव जमैकाला द्यायला तयार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. जमैकन सैन्यालाही भारत प्रशिक्षण देणार आहे. गुन्हेगारी, अंमली पदार्थांची वाहतूक, दहशतवाद ही दोन्ही देशांसमोरची आव्हानं आहेत आणि त्यावर एकत्रितरित्या प्रयत्न करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली.
Site Admin | October 1, 2024 8:13 PM | India | Jamaica