ऑस्ट्रियाबरोबरचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारताच्या बाजूने भरीव योगदान देण्यासाठी भारत सरकार सातत्यपूर्ण प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल ऑस्ट्रियात व्हिएन्ना इथं भारतीय समुदायाशी संवाद साधत होत्या.
ऑस्ट्रियाच्या विकासात भारतीय उद्योजकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबाबत त्यांनी प्रशंसा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रियामध्ये स्टार्ट अप्स, अर्थ तंत्रज्ञान, हरित तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक भागीदारी वाढवण्यासाठी दोन्ही देशांच्या उद्योजकांमध्ये उचित क्षमता असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे.