डिजिटल पायाभूत सुविधा अडथळा न होता दोन देशांना जोडणारा सेतू बनवणार असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समिट ऑफ द फ्यूचर या शिखर परिषदेमध्ये बोलत होते. लोकहितासाठी भारत आपल्या डिजिटल पायाभूत सुविधांचा आराखडा जगासमोर मांडायला तयार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सुरक्षित तंत्रज्ञान आणि जबाबदारीनं त्याचा वापर करण्यासाठी नियमांची गरज असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. मानवी जीवनाची सफलता युद्धात नसून सामूहिक शक्तिमध्ये असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. शांतता आणि सुरक्षिततेविषयी बोलताना मोदी म्हणाले की, एकीकडे जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी दहशतवादाचं गंभीर आव्हान आहे तर दुसरीकडे सायबर सुरक्षा, सागरी आणि अंतरिक्ष संघर्ष हे नवे धोके निर्माण होत आहेत. जागतिक भविष्याचा विचार करताना मानव केंद्रित दृष्टिकोनाला प्राथमिकता दिली पाहिजे अशी अपेक्षाही प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. ‘एक पृथ्वी,एक कुटुंब,एक भविष्य’ यासाठी भारत वचनबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | September 24, 2024 9:50 AM | PM Narendra Modi