डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत 2027 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असून देशाचा विकास दर सात टक्क्यांच्या आसपास राहील – उद्योग मंत्री पियूष गोयल

भारत 2027 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असून देशाचा विकास दर सात टक्क्यांच्या आसपास राहील असा अंदाज वर्तवण्यात आला असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी काल सांगितलं. लाओस इथं आयोजित 12 व्या पूर्व आशियाई देशांच्या अर्थमंत्र्यांच्या शिखर परिषदेत ते बोलत होते. पूर्व आशिया समिट फोरम बळकट करण्यास भारत वचनबद्ध असल्याचा गोयल यांनी पुनरुच्चार केला तसंच या मंचानं शांतता, स्थैर्य आणि आर्थिक भरभराटीला चालना देण्यात बजावलेल्या भूमिकेची प्रशंसा केली. जागतिक व्यापार संघटना अधिक खुली, पारदर्शी आणि समावेशक होण्यासाठी या संघटनेच्या सुधारणा प्रक्रियेबद्दल भारताच्या कटिबद्धतेचाही गोयल यांनी आपल्या भाषणात ऊहापोह केला.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा