भारत आणि भूमध्यसागरीय देशांमधले व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज केलं. ते नवी दिल्लीत भारत-भूमध्य व्यापार परिषदेत बोलत होते. भूमध्यसागरीय देशांमध्ये उत्पादित वस्तूंसाठी भारत ही मोठी बाजारपेठ असल्याचं ते म्हणाले. जागतिक व्यापारासाठी मार्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी भूमध्यसागरीय देशांचे आभार मानले. भारतीय बंदरांचा वेगानं विकास करण्याचं काम सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | September 6, 2024 8:10 PM | Minister Piyush Goyal
भूमध्यसागरीय देशांमध्ये उत्पादित वस्तूंसाठी भारत मोठी बाजारपेठ – मंत्री पीयूष गोयल
