भारत आणि इंडोनेशियाच्या नौदल प्रमुखांमध्ये काल झालेल्या द्वीपक्षीय संवादात उभय देशांदरम्यान सागरी सहकार्य दृढ करणे आणि द्वीपक्षीय संबंध मजबूत कऱण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. भारताचे नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी आणि इंडोनेशियाचे ऍडमिरल मुहम्मद अली यांच्या दिल्लीत काल सागरी शक्ती सरावाला पुढे नेणे, परिचालन सहकार्य मजबूत करणे आणि समुद्री चाचेगिरी, बेकायदेशीर कारवायांसारख्या सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी परस्पर सहकार्य मजबूत करण्याविषयी चर्चा झाली. अॅडमिरल अली यांनी ब्रह्मोस एअरोस्पेसलाही भेट दिली. संरक्षण आणि रणनीती क्षेत्रात द्वीपक्षीय सहकार्य अधिक मजबूत कऱण्यासाठी संकल्पना आणि अंतदृष्टीची देवाण घेवाणही करण्यात आली.
Site Admin | January 28, 2025 3:00 PM | India | Indonesia
भारत आणि इंडोनेशियाचे नौदल प्रमुख यांच्यात द्वीपक्षीय बैठक
