भारत हा पॅरिस कराराअंतर्गत निर्देशांकातले टप्पे वेळेआधीच गाठणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. ते आज सीआयआय – आयटीसीच्या शाश्वतता विषयक १९व्या शिखर परिषदेत बोलत होते. शाश्वत पर्यावरणासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे, त्याअंतर्गत पुनर्वापर आणि पुनर्निमित वापरावर भर दिला जात आहे, यामुळे शाश्वत जीवनशैलीचा मार्ग प्रशस्त होईल असं ते म्हणाले. प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार असून, शाश्वतता हा त्यातला मुख्य घटक असल्याचं ते म्हणाले.
Site Admin | September 17, 2024 7:57 PM | Union Minister Bhupendar Yadav