डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

म्यानमार हिंसाचारामुळे भारताच्या सीमेवर निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल भारताकडून चिंता व्यक्त

भारताच्या सीमेवर म्यानमारमधे सुरू असलेली हिंसा आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याबद्दल भारताला मोठी चिंता वाटत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत  जयशंकर तसंच म्यानमारचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यु थान श्वे यांनी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. 

अंमली पदार्थाची बेकायदा देवाणघेवाण, शस्त्रास्त्र आणि मानवी तस्करी ही प्रमुख आव्हानं असल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. म्यावद्दी इथं अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर भारतात पाठवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती त्यांनी म्यानमारकडे केली.  म्यानमारमधे सुरू असलेल्या भारतीय प्रकल्पांना सुरक्षा मिळाली पाहिजे या मुद्द्यावर त्यांनी भर दिला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा