भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात वर्ष अखेरपर्यंत मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी आज दिले. सचिव तन्मय लाल यांनी आज दुपारी नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी चर्चा केली. या कराराबाबत वाटाघाटी सुरू असल्याचं तन्मय लाल यांनी सांगितलं. पुरवठा साखळी आणि कौशल्य वाढवणं, सेमीकंडक्टरच्या सामंजस्य कराराबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. भारताचं एआय मिशन आणि युरोपियन एआय ऑफिसमध्येही सहकार्य वाढत असल्याचं ते म्हणाले. हरित ऊर्जेवर संशोधन प्रकल्पांसाठी ६ कोटी युरोचा निधी जाहीर करण्यात आला असल्याचं त्यांनी नमूद केलं.
Site Admin | February 28, 2025 7:02 PM | Europe | India
भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात वर्ष अखेरपर्यंत मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याचे निर्देश
