भारत आणि युरोपीय संघांदरम्यान ब्रुसेल्समध्ये व्यापार करारासाठी आज दहावी बैठक होणार आहे. व्यापार करारासंदर्भातील उर्वरीत मुद्यावर यावर्षीच्या अखेरपर्यंत सहमती होण्याची अपेक्षा आहे. युरोपियन संघटनेचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफकोविक यांच्या अलिकडच्या भेटीदरम्यान, दोन्ही गटांदरम्यान संतुलित आणि परस्पर हिताच्या असलेल्या विविध करारांना अंतिम रुप देण्याच्या प्रयत्नांना गती देण्याच्या दृष्टीनं चर्चा झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाच्या वतीनं शुल्क वाढ करण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे पाहिलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी गेल्या महिन्यात भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार या वर्षापर्यंत पूर्ण करण्याचे मान्य केले होते.