डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 28, 2025 1:27 PM | EU | India

printer

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यात चर्चा

भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात वर्ष अखेरपर्यंत मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरुप दिलं जाईल, अशी आशा युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी चर्चा केली. यावेळी भारत-युरोपियन संघ यांच्यात धोरणात्मक भागीदारीला नवीन चालना देण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. युरोपियन युनियन भारतासोबतचा आपला व्यापार विस्तारायला उत्सुक असून प्रस्तावित मुक्त व्यापार करार दोन्हींमध्ये आर्थिक सहभागात लक्षणीय वाढ करेल असं मत लेयन यांनी यावेळी व्यक्त केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा