ऑकलंड इथे सुरू असलेल्या एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांब्री आणि फ्रेंचचा अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीने पुरुष दुहेरी प्रकाराच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी लॉयड ग्लासपूल आणि ज्युलियन कॅश या तिसऱ्या मानांकित ब्रिटीश जोडीचा ३-६, ६-४, १२-१० असा पराभव केला.
राजीव राम आणि ख्रिश्चन हॅरिसन या अमेरिकन जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सच्या सॅडियो डुम्बिया आणि फॅबियन रेबोल या जोडीचा ७-५, ६-७, १०-५ असा पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.