भारताची पुरवठा साखळी परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं की, देशाच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टप्पा आहे. मंत्रालयानं सांगितलं की, भारत प्रशांत आर्थिक रचनेतील भारत आणि इतर 13 भागीदारांनी मिळून पुरवठा साखळीतील लवचिकता टिकून राहण्याच्या दृष्टीने समृद्धी करारासाठी भारत प्रशांत आर्थिक रचनेसंदर्भात 3 पुरवठा साखळी संस्था स्थापन केल्या आहेत. मंत्रालयांम सांगितलं की, पुरवठा साखळी परिषदेच्या अध्यक्षपदी अमेरिकेची निवड झाली आहे. आपत्ती निवारण संपर्क यंत्रणेच्या अध्यक्षपदी कोरिया तर उपाध्यक्षपडी जपानची निवड झाली आहे तर कामगार हक्क सल्लागार समितीचं अध्यक्षपद अमेरिका तर उपाध्यक्षपद फिजी हे देश भूषविणार आहेत.