प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर दोन्ही नेत्यांमधे यावेळी सहमती झाली. फ्रेडरिक्सन यांच्याशी विविध प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे सांगितलं.
पुढच्या वर्षी नॉर्वे मधे होणाऱ्या तिसऱ्या भारत-नॉर्डिक परिषदेची आणि तिथं प्रधानमंत्री फ्रेडरिक्सन यांच्या भेटीची आपल्याला उत्सुकता असल्याचं मोदी म्हणाले.