डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

टी-२० महिला क्रिकेट : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १० गडी राखत विजय

भारत आणि दक्षिण अफ्रिके दरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या 20 षटकांच्या महिला क्रिकेट सामन्यात तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघानं 10 गडी राखून पाहुण्या संघावर दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी 85 धावांचं लक्ष्य भारतीय खेळाडूंनी केवळ 10 षटकं आणि 6 चेंडूत पार केलं. या मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. कालचा सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी राखली. वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकारला तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. तर संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणूनही घोषित करण्यात आले.

 

काल झालेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिका संघानं 17 षटकं आणि एका चेंडूत 84 धावा केल्या. भारताच्या स्मृती मंधानानं 40 चेंडूत 54 धावा तर शेफाली वर्मानं 25 चेंडू खेळत नाबाद 27 धावा केल्या. या खेळामुळे भारतीय महिला संघानं आपल्याच संघाचा 2021 चा विक्रम मोडला. दक्षिण अफ्रिकेविरुध्दच खेळताना 11 षटकांमध्ये विजय मिळवला होता

सर्वाधिक वाचले

सर्व पहा